देवमाणूस मालिकेने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. ही मालिका सध्या वेगळ्या वळणार आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरीही मालिकेतील कलाकारांची सोशल मिडियावर मात्र खूप चर्चा सुरूये. मालिकेतील एका पात्राने मात्र प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सरू आजी. मालिकेत सरू आजीची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रूक्मिणी सुतार साकारतायेत. मालिकेत डोळ्याला चष्मा आणि नऊवारी साडीत सगळ्यांनीच सरू आजीला पाहिलयं. मात्र सरू आजी ऑनस्क्रिन जशी दिसते तशी अजिबातच नाहीये. नुकताच सोशल मिडीयावर सरू आजीचा मॉर्डन लूक चाहत्यांसमोर आलाय. मालिकेत वंदी आत्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री पुष्पा चौधरी हिने काही दिवसांपूर्वी सरू आजीसोबतचा फोटो शेअर केलाय. सरू आजीचा हा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. मालिकेतील मायलेकींचा हा हटके लूक सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. तर सरू आजीचे हे फोटो पाहून चाहत्यांना तिला ओळखताचं आलं नाहीये. रिल लाईफमध्ये दिसणाऱ्या सरू आजीचा रिअल लाईफ अंदाज पाहून चाहते त्यांचे कौतुक करत आहेत.
Snehalvo
#Devmanus #Saruaaji #Rukminisutar #Virallook #Devisingh #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber